• स्थापना वर्ष :1961
  • वर्ष :2017-
  •      
  • |
  • सुस्वागतम
  • |
  • संस्था वेबसाईट
  • |
  • A+
  • मराठी
साने गुरुजी शिक्षणप्रसारक मंडळ, आपले सहर्ष स्वागत करीत आहोत.संस्थेच्या एकूण ५० विविध शाखांचा विस्तार आहे.नाशिकरोड परिसरातील एक वैभवशाली व दैदिप्यमान परंपरा असलेली एक नामांकित संस्था .
वार्षिक क्रीडा महोत्सव वृत्त
        साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, के.जे.मेहता हायस्कूल व ई.वाय.फडोळ ज्यू.कॉलेज मध्ये वार्षिक
क्रीडामहोत्सवाचे उदघाटन शिक्षण उपसंचालक मा. रामचंद्र जाधव यांचे हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. गणपराव मुठाळ हे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव मा. प्रवीण जोशी , प्राचार्या अलका दुनबुळे, के.एन.केला. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या अश्विनी दापोरकर ,उपप्राचार्य संजय शिंदे ,उपप्राचार्या
कल्पना रकिबे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक श्री. सूर्यवंशी यांनी केले. पर्यवेक्षक श्री. दशरथ
जारस यांनी प्रमुख अतिथी शिक्षण उपसंचालक यांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन क्रिडा शिक्षक श्री. शिरसाठ यांनी केले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी
ज्योतीचे संचालन केले. क्रीडा ध्वजारोहण करून क्रीडामहोत्सवाचे उदघाटन करण्यात आले . सर्व खेळाडूना शपथ देण्यात आली.
        संचालनात मानवंदना देण्यात आली. शिक्षण उपसंचालक मा. रामचंद्र जाधव यानी मनोगतात विद्यार्थ्यांचे
शरीर खेळामुळे तंदुरुस्त व सदृढ बनते. त्यांच्यात संघभावना व नेतृत्व गुणांचा विकास होतो. सर्व खेळाडूंनी क्रीडा स्पर्धांत यश संपादन करावे व विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा
असे नमूद केले. मिनी ऑलंपिक सोहळा संस्था सादर करते त्याबद्ल कौतुक केले.
        संस्था सेक्रेटरी मा.प्रवीण जोशी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी खेळाचे
महत्व सांगितले.अध्यक्षीय भाषणात मा. मुठाळ साहेबांनी विद्यार्थ्यांना खेळाची आवड वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस मान्यवरांचे आभार क्रीडा शिक्षक श्री. निळे यांनी मानले.