• स्थापना वर्ष :1961
  • वर्ष :2017-
  •      
  • |
  • सुस्वागतम
  • |
  • संस्था वेबसाईट
  • |
  • A+
  • मराठी
साने गुरुजी शिक्षणप्रसारक मंडळ, आपले सहर्ष स्वागत करीत आहोत.संस्थेच्या एकूण ५० विविध शाखांचा विस्तार आहे.नाशिकरोड परिसरातील एक वैभवशाली व दैदिप्यमान परंपरा असलेली एक नामांकित संस्था .
संस्थाचालक माहिती
स्व. डॉ. भा. वि . जोशी माहिती
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करताना सिंहाचा वाटा असलेले आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ , लोककल्याणकारी पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त , एक कुशल संघटक म्हणून मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक, शिक्षक हक्कांसाठी संघटनात्मक कार्याचा ठसा उमटवणारे , विविध संस्थाचे मार्गदर्शक ,संस्था हे कुटुंब समजून सर्वांची काळजी घेणारे, एक कुशल संस्थाचालक, राज्यभर संस्थेचा प्रसार करणारे, संस्था हा श्वास समजून अहोरात्र परिश्रम करून संस्थेचा विकास हाच ध्यास सदैव बाळगून अखेरच्या क्षणा पर्यंत संस्थेचा विकास साधणारे व्यक्तिमत्व आता आमच्यात नाहीत . त्यांच्या या संस्थारूपी वृक्षाची जोपासना पुढे चालू आहे.

स्व. श्री. पांडे शि. के. माहिती
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करताना सिंहाचा वाटा असलेले आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ , विविध शिक्षक संघटनात कामाचा ठसा उमटवलेले, इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळवलेले, सर्वांचे म्हणणे समजून मार्ग काढण्यास पुढाकार घेणारे , स्वत: शिक्षकी पेशातील असल्याने शिक्षकांच्या समस्या सरकार दरबारी मांडणारे व्यक्तिमत्व म्हणून खास परिचित होते.संस्था हा श्वास समजून अहोरात्र परिश्रम करून संस्थेचा विकास हाच ध्यास सदैव बाळगून अखेरच्या क्षणा पर्यंत संस्थेचा विकास साधणारे आता आमच्यात नाहीत . त्यांच्या या संस्थारुपी वृक्षाची जोपासना पुढे चालू आहे.

स्व. श्री. ई.वाय. फडोळ माहिती
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करताना सिंहाचा वाटा असलेले आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ञ व्यावसायिक , संस्थेला कुटुंब समजून सर्वांशी प्रेमाने वागणारे, काळजी घेणारे संस्थेचे नेतृत्व होते.एक कुशल संघटक म्हणून कार्याचा ठसा उमटवणारे , संस्था हा श्वास समजून अहोरात्र परिश्रम करून संस्थेचा विकास हाच ध्यास सदैव बाळगून अखेरच्या क्षणा पर्यंत संस्थेचा विकास साधणारे आता आमच्यात नाहीत . त्यांच्या या संस्थारूपी वृक्षाची जोपासना पुढे चालू आहे.

श्री. आर. आर. कानवडे माहिती
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करताना सिंहाचा वाटा असलेले आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ , शिक्षक म्हणून सदैव ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची तगमग करत संस्थेचा विकास साधणारे व्यक्तिमत्व होते.ते एक कुशल संघटक म्हणून कार्याचा ठसा उमटवणारे , संस्था हा श्वास समजून अहोरात्र परिश्रम करून संस्थेचा विकास हाच ध्यास सदैव बाळगून अखेरच्या क्षणा पर्यंत संस्थेचा विकास साधणारे आमच्यात होते. त्यांच्या या संस्थारूपी वृक्षाची जोपासना चालू आहे.

पै . श्री. अत्तार साहेब माहिती
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करताना शिक्षण क्षेत्रातील जाणकार , स्वत: ते शिक्षक होते. संस्थेच्या विकासात भर घालताना त्यांनी वेळोवेळी अडचणींतून मार्ग काढण्यासाठी सहभाग घेतला.

स्व. श्री. वि.भा. अरिंगळे माहिती
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करताना सिंहाचा वाटा असलेले आणि सामाजिक कार्यात सहभाग घेणारे, एक कुशल कामगार संघटक म्हणून कार्याचा ठसा उमटवणारे , संस्था हा श्वास समजून अहोरात्र परिश्रम करून संस्थेचा विकास करायचा हाच ध्यास सदैव बाळगून अखेरच्या क्षणा पर्यंत संस्थेचा विकास साधणारे एक धुरंधर व्यक्तिमत्व होते. त्यांनी संस्था वाढीसाठी अथक परिश्रम घेतले.
अध्यक्ष: श्री.प्रविण भा. जोशी विद्यमान : संस्था अध्यक्ष
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सेक्रेटरी पद सांभाळत असून संस्थेसाठी अहोरात्र काम करणारे एक उतुंग आणि तडफदार असे नेतृत्व आहे. गोर गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सदैव धडपड करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या संपूर्ण कारभारावर लक्ष ठेवणारे नेतृत्व .भविष्यातील डिजिटल शिक्षण सुविधांसाठी विविध प्रोजेक्ट्सची आखणी करत असत्तात.संस्थेचे कामकाज दैनंदीन पाहत असतात.

सेक्रेटरी श्री. पांडे एम.एस. विद्यमान :सेक्रेटरी
नाशिक या ठिकाणी एका कंपनीत कार्यरत असून साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे खजिनदार म्हणून काम पाहतात. संस्थेची धेय्य धोरणे ठरविताना विशेष सहभाग नोंदवून मार्गदर्शनही करत असतात.संस्थेचे कामकाज दैनंदीन पाहत असतात.

खजिनदार :श्री.अरिंगळे ए.व्ही. विद्यमान : खजिनदार
मुंबई या ठिकाणी कार्यरत असून साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची भरभराट होण्यासाठी ते विविध प्रकारे सदैव मदत करत आहेत. संस्थेचे नाव सर्वदूर पसरत जाण्यासाठी प्रयत्नरत असतात.

विश्वस्त : डॉ. श्री. भूषण आर. कानवडे विद्यमान विश्वस्त
पेशाने डॉक्टर असून समाजाची सेवा करत आहेत. त्याच बरोबर शिक्षण क्षेत्रातही काम करताना संस्थेच्या वाढीसाठी वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन करतात.लिंगदेव येथील शाखेकडे विशेष लक्ष पुरवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी द्क्षता घेत असतात.